हे खरंच आहे खरं


|| हे खरंच आहे खरं ||


हे खरंच आहे खरं
हे खरंच आहे खरं
की भीमराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर||

महाविरोध कवटाळीला
जातीभेदाच्या तोडिल्या तोफा
मार्ग सत्याचा दाविला सोपा
आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो
बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा
जाणून महती सुखानं जगती
दलितांची लेकरं
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर||

भारताला जी होती हवी
अशी लिहिली घटना नवी
नवज्ञानाचा होता रवी हो
काय वर्णावी ही थोरवी
जोवर धरती हरेंद्रा कीर्ती राहील अजरामर
बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतंय हो जगभर||

                                                            कवी- हरेंद्र जाधव

                                                              गायक- विठ्ठल उमप


Comments

Popular posts from this blog

सोनियाची उगवली सकाळ

पाहा पाहा मंजुळा