सोनियाची उगवली सकाळ
|| सोनियाची उगवली सकाळ ||
सोनियाची उगवली सकाळ
उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ||
भिमाई माता प्रसूत होता
भिमाई माता प्रसूत होता
हर्षित झाले ते रामजी पिता
धन्य झाली कुळी सकपाळ हो हो
धन्य झाली कुळी सकपाळ,
कुळी सकपाळ
जन्मास आले भीमबाळ|3|
तारीख चौदा एप्रिल माहे
तारीख चौदा एप्रिल माहे
महूगावात हे वारे वाहे
ठेंगणे भासे आभाळ हो हो
ठेंगणे भासे आभाळ,
भासे आभाळ
जन्मास आले भीमबाळ|3|
रूप तेजस्वी चंद्रापरी ते
रूप तेजस्वी चंद्रापरी ते
जळकत होते अवनीवरी ते
केला सुखाने प्रतिपाळ हो हो
केला सुखाने प्रतिपाळ,
सुखाने प्रतिपाळ
जन्मास आले भीमबाळ|3|
मोठा झाला शिकला सवरला
मोठा झाला शिकला सवरला
संधी पाहून मग पुढे तो ठरला
जीर्ण रुढीचा कर्दनकाळ हो हो
जीर्ण रुढीचा कर्दनकाळ,
कर्दनकाळ
जन्मास आले भीमबाळ|3|
सोनियाची उगवली सकाळ हो हो
सोनियाची उगवली सकाळ,
उगवली सकाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ
जन्मास आले भीमबाळ
कवि- प्रल्हाद शिंदे/ मधुकर घुसळे
गायक- आनंद शिंदे
Comments
Post a Comment